🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कोल्हापूर l प्रतिनिधी- प्रमोद सूर्यवंशी –
दि० ३ जानेवारी २०२४ रोजी लेखक डॉ. प्रविण घोडेस्वार लिखित ‘गुटेनबर्गच्या सावल्या या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कमला कॉलेज, कोल्हापूर येथे नुकताच पार पडला.https://sindhudurgsamachar.in/kokan-पराभवाला-खचून-न-जाता-पुन्/
पुरुष प्रधान संस्कृतित स्त्रियांच्या कामगिरीची दखल विशेषत्वाने घेतली जात नाही. भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री पाटील कासोट यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून साहित्य क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्याबद्दल त्यांचे साहित्य विश्वात विशेष कौतुक होत आहे.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, जेष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे शैक्षणिक सल्लागार डॉ. आर.व्ही. कुलकर्णी, मुक्त विद्यापीठाचे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भाग्यश्री पाटील कासोट यांनी सर्वांचे आभार मानले.