Kokan: ९ जानेवारीला टिळक टर्मिनस – कोच्युवेली गाडीची अंतिम फेरी

0
16
टिळक टर्मिनस - कोच्युवेली गाडी
९ जानेवारीला टिळक टर्मिनस - कोच्युवेली गाडीची अंतिम फेरी

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l रत्नागिरी l 07 जानेवारी

नाताळ व नववर्षानिमित्त पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एलटीटी-कोच्युवेली साप्ताहिक स्पेशलच्या आठ फेऱ्या सुरू केल्या होत्या. या गाडीची दि. ९ जानेवारी रोजी अंतिम फेरी धावणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-कामाचा-कोणताच-अनुभव-नसले/

नाताळ आणि नववर्षानिमित्त अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मध्य रेल्वेकडून एलटीटी- कोच्युवेली ही साप्ताहिक स्पेशल गाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या गाडीच्या तब्बल ८ फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावरून धावत होत्या. ही गाडी आता बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ९ रोजी या गाडीची शेवटची फेरी धावणार आहे.

दि. ९ रोजी एलटीटी येथून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १०:४५ वाजता कोच्युवेली येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात दि. ११ रोजी कोच्युवेलीतून सायंकाळी ४:२० वाजता सुटणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी आता आटोक्यात आली असल्याने ही गाडी बंद करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here