🛑युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचारl पांडुशेठ साठम l देवगड –
श्री देवी भगवती मंदिर मुणगे चा वार्षिक यात्रौत्सव सोमवार दि १३ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी या देवीची महती असल्यामुळे अनेक भाविक भक्तगण या देवीच्या यात्रौत्सवास येतात. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भगवती मातेच्या वार्षिक यात्रौत्सवास भेट देत दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-tvs-मोटर-कंपनी-भारत-मोबिलिट/
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, धीरज मेस्त्री, नितेश भोगले आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.