क्रांती दिनानिमित्त सिंधुदुर्गात ‘कोकण कला गौरव संमेलन’; ९ ऑगस्ट रोजी कलाकारांचा सन्मान
क्रांती दिनानिमित्त सिंधुदुर्गात ‘कोकण कला गौरव संमेलन’; ९ ऑगस्ट रोजी कलाकारांचा सन्मान
सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : क्रांती दिनाचे औचित्य साधून कोकणातील विविध कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी ‘कोकण कला गौरव संमेलन’ रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे.
कोकणातील कला, संस्कृती आणि परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच विविध क्षेत्रातील कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला, संगीत, नृत्य, नाटक, साहित्य, लोककला, शिल्पकला, छायाचित्रण तसेच इतर विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
कोकणातील कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि नवोदित कलावंतांना प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
क्रांती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सन्मान सोहळ्यास कोकणातील विविध क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.