सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा

0
9
सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा
सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा

सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा

मिरा-भाईंदर महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक

मिरा-भाईंदर :
नागरिकांना भविष्यात सक्षम, शाश्वत आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मिरा-भाईंदर महानगरपालिकेत सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता आणि आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना, उर्वरित कामांचे नियोजन, विविध विभागांमधील समन्वय तसेच प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत नागरिकांना भविष्यात पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देण्यात आला. तसेच प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, सभागृह नेते रवि व्यास, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here