एनडीआरएफकडून सिंधुदुर्गातील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण

0
6
एनडीआरएफकडून सिंधुदुर्गातील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण
एनडीआरएफकडून सिंधुदुर्गातील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण

एनडीआरएफकडून सिंधुदुर्गातील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण

आपत्ती व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ओरोस, दि. ६ ऑगस्ट :
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) मार्फत शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी बी. टी. चव्हाण माध्यमिक विद्यालय, चौके येथे तर दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी शिवाजी विद्यामंदिर, काळसे येथे प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भूकंप, पूर, आग, वादळ तसेच इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाची खबरदारी, सुरक्षित स्थलांतर (Evacuation), प्रथमोपचार, बचावकार्याची मूलभूत तत्त्वे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विविध आपत्तीजन्य परिस्थितींची प्रात्यक्षिके सादर करून आपत्तीच्या काळात स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here