ठाणे जिल्हा परिषदेत ११ आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण

0
6

आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर बढती; ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे आवाहन

ठाणे :
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष) पदावरील ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती देण्यात आली. समुपदेशन प्रक्रियेनंतर पदस्थापना आदेशांचे वितरण ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांना नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. ते म्हणाले, “पदोन्नती ही केवळ पदातील वाढ नसून अधिक जबाबदारीने सेवा करण्याची संधी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.”
तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले. नव्या जबाबदारीचे भान ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या पदोन्नतीमुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असून विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतही गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here