ज्ञानमंदिराला रंगोत्सवाची देणगी! पांगारी खापरेवाडी शाळेसाठी कमलाकर खापरे यांची ₹१० हजारांच्या रंगसाहित्याची भेट

0
7

दापोली, प्रतिनिधी (अरविंद मांडवकर) :
शिक्षणाची पंढरी अधिक आकर्षक, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावी या हेतूने पांगारी (तर्फे हवेली) येथील जि. प. शाळा पांगारी खापरेवाडीला गावाचे सुपुत्र व दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. कमलाकर खापरे यांनी सुमारे ₹१० हजार किमतीचे रंग व सजावटीचे साहित्य देणगी स्वरूपात प्रदान केले.
या देणगीमुळे शाळेचा परिसर अधिक सुशोभित होणार असून विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या विकासासाठी समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेण्याचा आदर्श श्री. खापरे यांनी या उपक्रमातून घालून दिला आहे.
श्री. कमलाकर खापरे यांच्या या उदार योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रविण खापरे व मुख्याध्यापक श्री. संदेश चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रविण खापरे म्हणाले, “या रंगसाहित्यामुळे शाळेचा परिसर अधिक आकर्षक होईल. विद्यार्थ्यांचे बालविश्व अधिक रंगीबेरंगी, आनंददायी आणि प्रेरणादायी बनण्यास या देणगीचा मोठा हातभार लागणार आहे.”
श्री. कमलाकर खापरे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शाळा परिवाराकडून कौतुक करण्यात आले. समाजातील दानशूर व्यक्तींनी शिक्षण क्षेत्रासाठी अशाच प्रकारे योगदान दिल्यास ग्रामीण भागातील शाळांचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here