🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ले l प्रतिनिधी-
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सुरा येथील रहिवासी आणि सद्या गोरेगाव मुंबई येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार न्हानू (राजन ) जयवंत चिपकर (वय ६२) यांचे आज १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुनगरी-ऑटो-रिक्षा-चाल/
वीस वर्षा पूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग समाचार ,तरुण भारत, रत्नागिरी टाईम्स, या दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर ते मुंबई येथे वास्तव्यास गेले. मुंबईमध्ये त्यांनी सांज सह्याद्री, आपला महानगर, महानगरी टाईम्स आधी दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून काम केले. पत्रकारिते बरोबर सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. पालघर जिल्ह्यात आदिवासी पाड्यात त्याचा सामाजिक कार्यात सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे, विवाहित बहीण असा परिवार आहे.