राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची नियुक्ती
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी सौ. निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला.
नियुक्तीनंतर सुनेत्रा अजित पवार यांनी निर्मला नवले यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच राज्यभर युवतींचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कार्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवतींना पक्षाशी जोडणे, संघटन विस्तार आणि विविध सामाजिक-राजकीय उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी निर्मला नवले यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते सूरज चव्हाण आणि प्रदेश प्रवक्त्या ॲड. सायली दळवी उपस्थित होते.