टेटवलीच्या स्मशानभूमीत हिरवाईची पेरणी; राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा स्तुत्य उपक्रम

0
10
टेटवलीच्या स्मशानभूमीत हिरवाईची पेरणी; राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा स्तुत्य उपक्रम
टेटवलीच्या स्मशानभूमीत हिरवाईची पेरणी; राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा स्तुत्य उपक्रम

टेटवलीच्या स्मशानभूमीत हिरवाईची पेरणी; राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा स्तुत्य उपक्रम

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
टेटवली : पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्याचा संदेश देत छत्रपती राजर्षी शाहू महाराज वरिष्ठ महाविद्यालय, टेटवली यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि ग्रामपंचायत टेटवली यांच्या संयुक्त विद्यमाने टेटवली येथील स्मशानभूमीत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी हा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
स्मशानभूमी परिसर अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षलागवड करत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. उदय शिंदे, प्रा. सौ. सानवी कदम, टेटवली गावचे सरपंच श्री. मोमीन टेटवलकर, ग्रामसेवक श्री. महाडिक भाऊ, उपसरपंच सौ. मेघना रेमजे, पोलीसपाटील श्री. अतिष भागवत, ग्रामपंचायत सदस्या सौ. वेदिका इदाते, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. सचिन कदम, सौ. सुषमा नाचरे, कु. शालिनी रेमजे, श्री. अविनाश रेमजे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी प्रमुख कु. साक्षी कोळंबे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘एक वृक्ष म्हणजे भविष्यासाठीची एक आशेची पालवी’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी केलेल्या वृक्षलागवडीमुळे स्मशानभूमी परिसराला नवी हिरवाई लाभणार आहे. महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच समाजोपयोगी कार्यात युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित झाले.
या उपक्रमाचे टेटवलीसह पंचक्रोशीतून कौतुक होत असून, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here