आमदार कालिदास कोळंबकर यांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सदिच्छा भेट
आमदार कालिदास कोळंबकर यांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सदिच्छा भेट
मुंबई | प्रतिनिधी
वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान मुंबईतील विविध नागरी प्रश्न, स्थानिक विकासकामे तसेच वडाळा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रश्नांना गतीने मार्गी लावणे याबाबतही यावेळी विचारविनिमय झाला.
सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत मुंबईच्या विकासासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.