नागरिकांची सेवा हीच माझी प्राथमिकता; महापौर रितू तावडे यांची प्रभाग १३२ मध्ये पाहणी
नागरिकांची सेवा हीच माझी प्राथमिकता; महापौर रितू तावडे यांची प्रभाग १३२ मध्ये पाहणी
मुंबई
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रभाग क्रमांक १३२ मधील विविध परिसरांची प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.
नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापौर तावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच आवश्यक सूचना दिल्या. परिसरातील नागरी सुविधा, स्वच्छता, रस्ते आणि अन्य विकासकामांचा आढावाही त्यांनी घेतला.
“नागरिकांची सेवा हीच माझी प्राथमिकता आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे जीवनमान अधिक सुखकर करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे महापौर रितू तावडे यांनी यावेळी सांगितले.
महापौरांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.