नाशिकला मिळणार देशातील अग्रगण्य AI शैक्षणिक केंद्राची नवी ओळख

0
10
नाशिकला मिळणार देशातील अग्रगण्य AI शैक्षणिक केंद्राची नवी ओळख
नाशिकला मिळणार देशातील अग्रगण्य AI शैक्षणिक केंद्राची नवी ओळख

नाशिकला मिळणार देशातील अग्रगण्य AI शैक्षणिक केंद्राची नवी ओळख

नाशिक
नाशिक शहराला लवकरच देशातील अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी विद्यापीठ प्रकल्पासाठी १६.८० हेक्टर (४१.५१ एकर) जमीन आरक्षित करण्यात आली असून जमिनीचा ७/१२ उताराही विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला आहे.
सुमारे ४००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संस्कृत माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सायन्स विषयातील बी.टेक अभ्यासक्रम सुरू करण्याची संकल्पना या विद्यापीठात राबविण्यात येणार आहे.
या विद्यापीठाची प्रवेश क्षमता सुमारे १,५०० विद्यार्थ्यांपर्यंत विकसित होणार असून, उच्च शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात नाशिकला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून नाशिकच्या शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here