PSI संजय चव्हाण यांच्या कर्तृत्वाला भारत सरकारच्या ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’चा सन्मान!

0
29
PSI संजय चव्हाण यांच्या कर्तृत्वाला भारत सरकारच्या ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’चा सन्मान!
PSI संजय चव्हाण यांच्या कर्तृत्वाला भारत सरकारच्या ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’चा सन्मान!

PSI संजय चव्हाण यांच्या कर्तृत्वाला भारत सरकारच्या ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’चा सन्मान!

गावाकडच्या मातीतून देशसेवेच्या सर्वोच्च जबाबदारीपर्यंत… 🇮🇳🏅

शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशप्रेमाच्या या प्रेरणादायी प्रवासाला मनःपूर्वक सलाम! 💐

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
वाकवली :
पोलीस दलातील अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक विभागांमध्ये धाडसी, कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवा बजावणारे वाकवलीचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक संजय विष्णू चव्हाण यांना भारत सरकारचे प्रतिष्ठेचे ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. हा सन्मान विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. एस. जयकुमार (भा.पो.से.), फोर्स वन, महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
संजय चव्हाण यांनी आपल्या सेवाकाळात खंडणीविरोधी पथक (Anti-Extortion Cell), दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि महाराष्ट्र पोलिसांचे विशेष अभिजात दल ‘फोर्स वन’ अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. गुन्हेगारीविरोधातील कारवाई, दहशतवादी कारवायांना प्रतिबंध तसेच तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील मोहिमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
कर्तव्य बजावताना तांत्रिक कौशल्यासोबतच धाडस, तत्परता आणि टीमवर्कला त्यांनी विशेष महत्त्व दिले. आव्हानात्मक परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्यांना या प्रतिष्ठेच्या पदकाने गौरविले आहे.
या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना PSI संजय चव्हाण यांनी आपल्या यशाचे श्रेय ईश्वराची कृपा, कोंडवाडी-वाकवली येथील ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादांना दिले. देशसेवा करण्याची संधी ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
संजय चव्हाण यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोंडवाडी आणि वाकवली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातून पोलीस दलात येणाऱ्या तरुणांसाठी त्यांचा कर्तव्यनिष्ठ आणि शौर्यपूर्ण प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here