भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी विविध विकासकामांचा आढावा
भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी विविध विकासकामांचा आढावा
भंडारा :
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भंडारा जिल्हा उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजावर बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विकास, उद्योजकांच्या अडीअडचणी, नवीन उद्योगपूरक योजना, उद्योग क्षेत्रातील समस्या तसेच उपलब्ध नवीन संधी याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
स्थानिक उद्योजकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करणे आणि जिल्ह्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी विभागांमध्ये समन्वय वाढविण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली.
या बैठकीला खासदार प्रशांतजी पडोळे, आमदार नरेंद्रजी भोंडेकर, माजी मंत्री धनंजयजी दलाल, जिल्हाधिकारी सावन कुमार, एमआयडीसीचे मुख्य अधिकारी जंजाळ, प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, श्री. बडर, खादी व ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.