राजापूर बंदर व प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने सादरीकरण

0
9

राजापूर बंदर व प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने सादरीकरण

रत्नागिरी :
राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासासंदर्भात ‘सेफ अँड शुअर पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीच्या वतीने सादरीकरण करण्यात आले.
या प्रकल्पासाठी कंपनीने राजापूर येथे सुमारे १०० एकर जागा अधिग्रहित केली आहे. प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी गुंतवणूकदार तसेच सक्षम भागीदार सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. राजापूर बंदराच्या विकासासोबतच प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक आणि सागरी क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here