नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बोईंग ७४७’चे दिमाखदार स्वागत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बोईंग ७४७’चे दिमाखदार स्वागत
नवी मुंबई :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) जगातील पहिले वाइड-बॉडी विमान ‘बोईंग ७४७’ दाखल झाले आहे. ‘क्वीन ऑफ द स्काइज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्रतिष्ठित विमानाचे विमानतळावर वॉटर कॅनन सॅल्यूट देत दिमाखदार स्वागत करण्यात आले.
‘नॅशनल एअरलाईन्स’चे बोईंग ७४७ विमान NMIA येथे दाखल झाल्याने विमान वाहतूक क्षेत्रात हा क्षण विशेष ठरला. विमानतळावर या दिग्गज विमानाचे शानदार स्वागत करण्यात आले.
बोईंग ७४७ हे जगातील विमान वाहतूक इतिहासातील एक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित विमान मानले जाते. त्यामुळे या विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेले आगमन हा विमान वाहतुकीच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
या निमित्ताने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षमतेची आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीतील वाढत्या महत्त्वाचीही झलक पाहायला मिळाली.