उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांच्या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

0
13

मुंबई :
उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी देवगिरी बंगला, मुंबई येथील आपल्या निवासस्थानी आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रश्न जाणून घेतले.

यावेळी नागरिकांनी विविध विषयांशी संबंधित प्रश्न आणि अडचणी उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सुनिता पवार यांनी नागरिकांचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या.
प्रत्येक नागरिकाच्या भावना आणि अपेक्षांचा विचार करून संबंधित प्रश्नांवर सकारात्मक आणि प्रभावी तोडगा काढण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारामुळे नागरिकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी थेट संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here