पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा धावपटूंना प्रेरणादायी संदेश
खारघर हिल महापौर मॅरेथॉन २०२६; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा धावपटूंना प्रेरणादायी संदेश
पनवेल :
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन २०२६’ निमित्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नागरिक आणि धावपटूंना प्रेरणादायी संदेश दिला.
निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि समाजातील सकारात्मक सहभाग वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नियमित व्यायाम आणि शारीरिक सक्रियतेमुळे आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळते, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
पनवेल महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या आयकॉनिक मॅरेथॉन उपक्रमाचे कौतुक करत सोमनाथ घार्गे यांनी आयोजकांना तसेच सहभागी धावपटू आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
खारघर हिल महापौर मॅरेथॉनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मक सामाजिक सहभागाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.