विधीमंडळ अधिवेशन: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली .यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी होता.परंतु आज पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळाचे कारण होते ओबीसी आरक्षण! सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे आमदार हे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच अध्यक्षांच्या दालनात अध्यक्षीय खुर्चीवरील अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 भाजप आमदारांचे एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. भाजप आमदारांच्या या निलंबनाचा निषेध म्हणून भाजपने दुसऱ्या दिवशी सभागृहा बाहेर प्रतिविधान सभा भरवली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर बोलताना म्हणाले काल जे घडले ते अत्यंत लाजिरवाणे होते. महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणी घटना होती. आपली ही संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. सध्या जे काही सुरू आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडत आहे? पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे’
मुख्यमंत्री ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्राकडे इम्पिरेकल डेटा मागण्याचा ठराव होता. आम्ही तोच ठराव विधिमंडळात केला आहे तर यामध्ये चुकीचे काय आणि एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? यामध्ये नवीन आम्ही काय केले आहे. जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तिन्ही पक्षाचे आम्ही नेते होतो त्यावेळी आम्ही इम्पिरेकल डेटाची मागणी सुद्धा केलेली होती. राज्यपालांना सुद्धा आम्ही ही विनंती केली होती ही माहिती केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ”लोकप्रतिनिधींकडून जनतेची एक वेगळी अपेक्षा असते, की मी तुम्हाला का मत देतोय? तर माझ्या आयुष्यात काही चांगला बदल घडला पाहिजे आणि तो जिथे घडवला जातो, तिथे मी तुम्हाला पाठवतो आहे. तिथे गेल्यानंतर काल जे काही दृश्य पाहायला मिळालं, खरोखर शरमेने मान खाली जावी असं ते दृश्य होतं आणि जबाबदार पक्षाकडून हे घडलं. हे आम्ही घडवलेलं नव्हतं.”