जिल्हा परिषद ठाणेच्या आरोग्य विभागातील ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती
जिल्हा परिषद ठाणेच्या आरोग्य विभागातील ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती
आरोग्य सेवक महिला पदावरून आरोग्य सहाय्यक महिला पदावर नियुक्ती
ठाणे :
जिल्हा परिषद, ठाणेच्या आरोग्य विभागातील ३० आरोग्य सेवक महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक महिला पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती आदेशांचे वितरण २७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते करण्यात आले.\
पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले. तसेच नव्या पदाची जबाबदारी, कामकाजाची पद्धत आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रभावी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. माता व बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण, विविध आरोग्य योजना तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग असतो.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “पदोन्नतीसोबत जबाबदारीही वाढते. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून नव्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने व कार्यक्षमतेने पार पाडून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा द्याव्यात.”
पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी नवीन जबाबदारी, नवी ऊर्जा आणि नागरिकसेवेचा नवा संकल्प घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.