पश्चिम रेल्वेचे नवीन उपनगरीय वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू

0
8
पश्चिम रेल्वेचे नवीन उपनगरीय वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू
पश्चिम रेल्वेचे नवीन उपनगरीय वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू

पश्चिम रेल्वेचे नवीन उपनगरीय वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू

एसी लोकल सेवांमध्ये वाढ

मुंबई :
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी, प्रवाशांची सोय सुधारण्यासाठी आणि वाढती मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने १ सप्टेंबर २०२६ पासून उपनगरीय कार्य वेळापत्रक–७९ लागू करण्यात येणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेच्या एकूण १,४१४ उपनगरीय सेवा सुरू राहणार असून सेवांच्या एकूण संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
६ नवीन सेवा, ६ सेवा रद्द
नवीन वेळापत्रकात ६ नवीन उपनगरीय सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये २ अप आणि ४ डाउन सेवांचा समावेश आहे. त्याचवेळी ६ सेवा रद्द करण्यात येणार असून त्यामध्येही २ अप आणि ४ डाउन सेवांचा समावेश आहे.
एसी लोकल सेवांमध्ये वाढ
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून एसी उपनगरीय सेवांची संख्या १४५ वरून १४७ करण्यात आली आहे.
मात्र, डहाणू रोडसाठी कोणतीही नवीन ईएमयू सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे डहाणू रोडच्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत बोरीवलीसाठी सायंकाळी ५.५५ वाजताची एसी लोकल आणि त्यानंतर सायंकाळी ७.२५ वाजताची थेट एसी लोकल उपलब्ध राहणार आहे. तसेच सायंकाळी ६.२२ आणि ७.०५ वाजताच्या लोकल बोरीवली स्थानकावर थांबणार नाहीत.
प्रवाशांनी नव्या वेळापत्रकानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि प्रवासापूर्वी लागू असलेले अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here