महाराष्ट्राच्या युवा विंडसर्फर्सचे दैदिप्यमान यश; सुनेत्रा पवारांकडून खेळाडूंचे अभिनंदन

0
3

मुंबई :
मलेशियातील लंगकावी येथे आयोजित २०२६ टेक्नो २९३ आशियाई अजिंक्यपद विंडसर्फिंग स्पर्धेत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील युवा विंडसर्फर्सनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी पदकांची दमदार कामगिरी करत राज्याचा तसेच भारताचा गौरव वाढवला. कु. वैष्णवी विशाल काजळे आणि कु. अस्मी शेरेकर यांनी सुवर्णपदक पटकावले. तर कु. रयहान गोधवानी, कु. नाव्या काकू, कु. वर्तिका म्हात्रे आणि कु. ओम बाबुराव कोरवी यांनी रौप्यपदक मिळवले.
याशिवाय कु. प्रियांशी पाटील आणि कु. विहान प्रकाश यांनी कांस्यपदकाची कमाई केली. अल्पवयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या या युवा खेळाडूंचे सुनेत्रा पवार यांनी कौतुक केले.
खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, व्यवस्थापक तसेच यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्रातील युवा खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही कामगिरी राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here