डॉ. अमोल अन्नदाते यांचा सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
डॉ. अमोल अन्नदाते यांचा सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
वैजापूर :
प्रख्यात बालरोगतज्ज्ञ, नवजात शिशु अतिदक्षता तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. अमोल अन्नदाते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या माध्यमातून जनसेवेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला.
आरोग्यसेवा, शिक्षण आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून डॉ. अन्नदाते यांनी वैजापूरसह मराठवाड्यात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा तसेच जनसेवेतील कार्याचा पक्षाला निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
डॉ. अमोल अन्नदाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मनापासून स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.