खाजगी शिकवणी केंद्र नियमन कायदा मसुद्यावर सूचना-हरकतींसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

0
28

मसुद्यावर आतापर्यंत ११ हजारांहून अधिक सूचना व हरकती प्राप्त; नागरिकांना अभिप्राय नोंदविण्याची आणखी संधी

मुंबई :
खाजगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी प्रस्तावित खाजगी शिकवणी केंद्र नियमन कायदा मसुद्यावर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या मसुद्यावर नागरिक, विद्यार्थी, पालक तसेच संबंधित घटकांकडून मोठ्या प्रमाणात अभिप्राय प्राप्त होत असून, आतापर्यंत ११ हजारांहून अधिक सूचना व हरकती शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
खाजगी शिकवणी केंद्रांच्या कामकाजाचे नियमन, विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण तसेच या क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि शिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने हा मसुदा तयार करण्यात आला आहे. मसुद्यावर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने संबंधितांना आपले मत मांडण्यासाठी अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे.
प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकतींचा विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here