सात्विणगावात शनिवारी ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन

0
30
सात्विणगावात शनिवारी ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन
सात्विणगावात शनिवारी ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन

सात्विणगावात शनिवारी ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन; निसर्ग संवर्धन व जैवविविधतेची माहिती नागरिक-पर्यटकांपर्यंत पोहोचणार

खेड :
महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग आणि वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांच्या वतीने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास राज्यमंत्री (गृह-शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन) योगेश कदम तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता अनंत केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे, सुनील तटकरे तसेच आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, शेखर निकम, भास्कर जाधव आणि किरण सामंत उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर श्री. लक्ष्मी (भा.व.से.) यांचीही उपस्थिती राहणार आहे.
सन्माननीय अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित राहणार आहेत.
निसर्ग संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि स्थानिक जैवविविधतेची माहिती नागरिक तसेच पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक निसर्गसंपदा आणि जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यासाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास निसर्गप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी (दापोली) राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here