सुनावणीशिवाय मतदार यादीतून कोणतेही नाव वगळू नका -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

0
31
सुनावणीशिवाय मतदार यादीतून कोणतेही नाव वगळू नका -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
सुनावणीशिवाय मतदार यादीतून कोणतेही नाव वगळू नका -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

सुनावणीशिवाय मतदार यादीतून कोणतेही नाव वगळू नका –जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

 SIR प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन

सिंधुदुर्ग :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) मतदार यादीतील त्रुटी दूर करणे तसेच दावे-हरकतींवर पारदर्शक कार्यवाही करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आले.
यावेळी कोणत्याही मतदाराचे नाव पुरेशी सुनावणी घेतल्याशिवाय मतदार यादीतून वगळू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. पुनरीक्षण प्रक्रियेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि पारदर्शक पद्धतीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक उपलब्ध असतात. या कालावधीचा सदुपयोग करून गावपातळीवर सुनावणीचे नियोजन करावे आणि सुनावणीची पूर्वकल्पना संबंधित नागरिकांना द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
प्रशिक्षणादरम्यान सुनावणी कक्षाची रचना, विसंगत (Anomaly) नावांबाबत करावयाची कार्यवाही, कायदेशीर निर्णय प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच मतदारांना नोटीस देणे, पुराव्यांच्या तपासणीसाठी तांत्रिक पथकांची मदत घेणे, रोजनामा नोंदविणे, निर्णय संकेतस्थळावर अपलोड करणे आणि मतदारांच्या सोयीसाठी जवळच्या अंतरावर सुनावणी केंद्र उपलब्ध करून देणे याबाबत अधिकाऱ्यांना तांत्रिक सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल प्रत्यक्ष पडताळणी मोहिमेत पूर्वीच्या ६,८८,०१४ मतदारांपैकी ८२,५१७ अपात्र नोंदी वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतील मतदारांची संख्या आता ६,०५,४९९ इतकी झाली आहे.
अनमॅप्ड व विसंगत नोंदींमध्ये वगळलेल्या तसेच दुरुस्ती आवश्यक असलेल्या नावांबाबत मतदार नोंदणी कार्यालयाकडून संबंधितांना नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना दावे व हरकती नोंदविता येतील. या दावे-हरकतींवरील सुनावणी २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here