महापौर रितू तावडे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन व महाप्रसादासाठी निमंत्रण
महापौर रितू तावडे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन व महाप्रसादासाठी निमंत्रण
१४ व १५ सप्टेंबर रोजी भायखळा येथील महापौर निवासस्थानी गणेशदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई :
परंपरेप्रमाणे यंदाही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या भायखळा येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. यानिमित्ताने नागरिकांना सोमवार, १४ सप्टेंबर आणि मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणरायाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह आवर्जून उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घ्यावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती महापौर रितू तावडे यांनी केली आहे.
पत्ता : महापौर निवासस्थान, वीर जिजामाता भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय, भायखळा (पूर्व), मुंबई.