सावंतवाडी रेल्वे स्थानकावर चिमुकल्यांचे रंगीबेरंगी स्वागत
चित्रकलेची पुस्तके आणि रंगीबेरंगी फुगे देत गणेशोत्सवासाठी आलेल्या बालगोपाळांचे स्वागत
सावंतवाडी :
गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे परतणाऱ्या चिमुकल्या बालगोपाळांचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. लहान मुलांना चित्र काढण्याची पुस्तके आणि रंगीबेरंगी फुगे देऊन त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले.

रेल्वे प्रवास करून सावंतवाडीत दाखल झालेल्या चिमुकल्यांच्या हातात चित्रकलेची पुस्तके आणि रंगीबेरंगी फुगे देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. या छोट्याशा पण मनमोहक स्वागतामुळे गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे येणाऱ्या बालगोपाळांचा उत्साह अधिकच वाढला.



