पीडीसीसी बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भावनिक वातावरणात संपन्न

0
26
 पीडीसीसी बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भावनिक वातावरणात संपन्न
 पीडीसीसी बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भावनिक वातावरणात संपन्न

 पीडीसीसी बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भावनिक वातावरणात संपन्न

दादांच्या आर्थिक शिस्तीची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार; शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यावर भर

पुणे :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (PDCC Bank) १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भावनिक वातावरणात पार पडली. यावेळी बँकेचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्याशी असलेल्या प्रदीर्घ संबंधांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. बँकेच्या आर्थिक शिस्तीपासून कर्जवाटप, कर्जवसुली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत त्यांनी सातत्याने लक्ष दिल्याचे उपमुख्यमंत्री  ‘सुनेत्रा पवार’ यांनी नमूद केले.

मार्च २०२६ अखेर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उलाढाल ३० हजार ७६८ कोटी रुपये, तर निव्वळ नफा ७९ कोटी रुपये झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी आणि सभासदांचे अभिनंदन करण्यात आले.
शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे हा दादांचा कायमचा आग्रह होता, असे नमूद करत शेतीपूरक व्यवसायांना अधिक वित्तपुरवठा करून शेतकऱ्यांचे उत्पन्नचक्र मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना’’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
दादांनी घालून दिलेली आर्थिक शिस्त, कार्यक्षमता आणि विश्वासाची परंपरा पुढे नेत पीडीसीसी बँकेला देशातील अग्रगण्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी हित, सहकाराचा विश्वास आणि बँकेची ताकद या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, तसेच बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी, सभासद आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here