उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांची आचरा संस्थानास भेट

0
14
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांची आचरा संस्थानास भेट
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांची आचरा संस्थानास भेट

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांची आचरा संस्थानास भेट

आचरा -विवेक परब
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांनी सहपत्नीक आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरास भेट देत श्रीदेव रामेश्वर तसेच मंदिरात विराजमान असलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ४१ दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती जाणून घेतली.
श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर जामसंडेकर यांनी सिंधुदुर्गवासीयांच्या सुख-समृद्धीसह निरोगी आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रार्थना केली. तसेच समाजात शांतता व ऐक्य नांदावे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत राहावी, अशी मनोकामना त्यांनी गणरायाच्या चरणी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान रामेश्वर संस्थानच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी यांच्या हस्ते न्यायाधीश अमित जामसंडेकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आचरा गावचे सॉलिसिटर तथा देवस्थान ट्रस्टी शिल्पन गावंकर, खजिनदार कपिल गुरव, ग्रामस्थ आणि देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here