आचऱ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी घेतले गणरायाचे दर्शन
आचऱ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी घेतले गणरायाचे दर्शन
४२ दिवसांच्या रामेश्वर मंदिरातील गणेशोत्सवासह घरगुती गणपतींचेही घेतले दर्शन
पत्रकार अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत यांच्या निवासस्थानी सत्कार
आचरा -विवेक परब
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी आचरा गावातील विविध गणेशमूर्तींचे दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आचरा येथील श्री रामेश्वर मंदिरात विराजमान असलेल्या ४२ दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवातील गणरायाचे, तसेच गावातील काही घरगुती गणपतींचे दर्शन घेतले.
पत्रकार अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत यांच्या निवासस्थानी सत्कार
आचरा येथील पत्रकार अर्जुन बापर्डेकर व पत्रकार परेश सावंत यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचेही संजय कातिवले यांनी दर्शन घेतले. यावेळी लक्ष्मण बापर्डेकर तसेच अरविंद सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी, पत्रकार अर्जुन बापर्डेकर, पत्रकार परेश सावंत, तलाठी सुनीता मेस्त्री,
अरविंद सावंत, आशिष सावंत, पोलीस कर्मचारी मिलिंद परब, मनोज पुजारे, विशाल वैजल, तसेच महेश बापर्डेकर, वेदान्त बापर्डेकर आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक कातिवले यांच्या या गणपती दर्शनामुळे ग्रामस्थांमध्येही आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.