एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर टाटा ट्रस्ट्सचा आक्षेप

0
7
एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर टाटा ट्रस्ट्सचा आक्षेप
एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर टाटा ट्रस्ट्सचा आक्षेप

एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर टाटा ट्रस्ट्सचा आक्षेप

पुनर्नियुक्तीचा ठराव ‘कायदेशीरदृष्ट्या अमान्य’; नोएल टाटा यांचे विरोधात मतदान

मुंबई :
टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्षपदी आणखी पाच वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णयाला टाटा ट्रस्ट्सने तीव्र आक्षेप घेतला आहे. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चार संचालकांनी पुनर्नियुक्तीच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष आणि नामनिर्देशित संचालक नोएल एन. टाटा यांनी विरोधात मतदान केले.
टाटा ट्रस्ट्सने आपल्या अधिकृत निवेदनात या पुनर्नियुक्तीच्या ठरावाला ‘कायदेशीरदृष्ट्या अमान्य’ (legal nullity) म्हटले आहे. ट्रस्ट्सच्या म्हणण्यानुसार, टाटा सन्सच्या Articles of Association नुसार अध्यक्षांची नियुक्ती किंवा पुनर्नियुक्ती करण्यासाठी ट्रस्ट्सच्या नामनिर्देशित संचालकांची आवश्यक बहुमताची संमती असणे गरजेचे आहे. नोएल टाटा यांनी प्रस्तावाला विरोध केल्याने ठराव वैधरीत्या मंजूर झालेला नाही, असा ट्रस्ट्सचा दावा आहे.
टाटा ट्रस्ट्सने पुढे म्हटले आहे की, चंद्रशेखरन यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी आपला सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुनर्नियुक्तीसाठी स्वतःहून पुढे न येण्याचा निर्णय जाहीर केला होता. ट्रस्ट्सने हा निर्णय स्वीकारून नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तो निर्णय अंतिम झाल्याचे ट्रस्ट्सचे म्हणणे आहे.
दरम्यान, नोएल टाटा यांनी ट्रस्ट्सच्या भूमिकेच्या समर्थनार्थ माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचे कायदेशीर मतही संचालक मंडळासमोर मांडल्याचे ट्रस्ट्सने म्हटले आहे. मात्र, हे मत संचालक मंडळाने विचारात घेतले नसल्याचा दावा ट्रस्ट्सने केला आहे.
चंद्रशेखरन यांचा सध्याचा कार्यकाळ २० फेब्रुवारी २०२७ रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय पुढील प्रक्रियेत कसा हाताळला जातो, याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. पुनर्नियुक्तीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची (AGM) मंजुरीही आवश्यक असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here