रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक २८ सप्टेंबरला
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक २८ सप्टेंबरला
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
रत्नागिरी :
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे. जिल्ह्यातील विकासकामे आणि नियोजनाशी संबंधित विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीस संबंधित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.