नेरुळमध्ये जयश्रीताई गोळे यांच्या घरी मनमोहक गौरी सजावट

0
26
नेरुळमध्ये जयश्रीताई गोळे यांच्या घरी मनमोहक गौरी सजावट
नेरुळमध्ये जयश्रीताई गोळे यांच्या घरी मनमोहक गौरी सजावट

नेरुळमध्ये जयश्रीताई गोळे यांच्या घरी मनमोहक गौरी सजावट

पारंपरिकतेला कलात्मकतेची जोड; सजावटीने वेधले सर्वांचे लक्ष

नेरुळ, नवी मुंबई :
गणेशोत्सवातील गौरी आगमनाचा आनंद द्विगुणित करणारी सुंदर आणि सुरेख सजावट सौ. जयश्रीताई रघुनाथ गोळे यांच्या नेरुळ, नवी मुंबई येथील घरी करण्यात आली आहे. आकर्षक मांडणी, सुंदर सजावट आणि पारंपरिकतेचा सुरेख मिलाफ यामुळे गोळे परिवारातील गौरीचे रूप मनाला भुरळ घालत आहे.
गौरीच्या आगमनानिमित्त घरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, सजावटीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि परंपरेची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. विविध आकर्षक घटकांनी केलेली सजावट गौरीच्या रूपाला अधिकच खुलवून टाकत आहे.
गौरी म्हणजे माहेरवाशीण लेकीच्या आगमनाचा आनंद, मायेची ऊब आणि कुटुंबीयांच्या प्रेमाचा उत्सव. त्यामुळे गौरीच्या आगमनाने गोळे परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीय आणि आप्तेष्ट भक्तिभावाने गौरीचे दर्शन घेत आहेत.
“गौरी आली माहेराला, आनंद झाला घराला!” 🌺🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here