भरतशेठ गोगावले यांची सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
भरतशेठ गोगावले यांची सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
गौरी-गणरायाचे घेतले दर्शन; परिवारातील सदस्यांशी साधला स्नेहपूर्ण संवाद
रायगड :
गौरी-गणपती उत्सवाच्या मंगलमय वातावरणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी भरतशेठ गोगावले यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी विराजमान गौरी-गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच तटकरे परिवारातील सर्व सदस्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधत गौरी-गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
गौरी-गणपतीच्या भक्तिमय वातावरणात झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे उत्सवी आनंदाला अधिकच रंगत आली.