भारताच्या लेकींची दमदार झेप; आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट फायनलमध्ये प्रवेश
भारताच्या लेकींची दमदार झेप; आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट फायनलमध्ये प्रवेश
मुंबई :
२०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा ११४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. भारतीय महिला संघाच्या या शानदार कामगिरीमुळे भारताचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे.
मैदानावर जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारतीय महिला खेळाडूंनी उपांत्य फेरीत दमदार विजय मिळवला. या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करत खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान असल्याचे म्हटले.
आता अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. या सामन्यातही भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरावे, अशा शुभेच्छा सुनेत्रा पवार यांनी दिल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या यशामुळे देशभरातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अंतिम सामन्यात सुवर्णपदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.