बालकावरील लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणाचा यशस्वी तपास; राजगड पोलिसांचा सन्मान

0
16

पुणे ग्रामीण :
बालकावरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या गंभीर प्रकरणाचा सखोल व प्रभावी तपास करून आरोपीला न्यायालयाकडून दोषी ठरवून देण्यात राजगड पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल तसेच साक्षीदारांच्या जबानी अशा महत्त्वपूर्ण पुराव्यांचा आधार घेत तपास पुढे नेला. उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर प्रभावीपणे सादर करण्यात आल्याने आरोपीला दोषी ठरविण्यात आले.
गंभीर गुन्ह्याचा सखोल तपास करून यशस्वीपणे दोषसिद्धी घडवून आणल्याबद्दल राजगड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली. त्यांच्या उल्लेखनीय तपासकार्याबद्दल त्यांना ‘सर्वोत्कृष्ट शिक्षा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे राजगड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे कौतुक होत असून, गंभीर गुन्ह्यांच्या तपासात वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here