रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ ऑक्टोबरला

0
8
रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ ऑक्टोबरला
रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ ऑक्टोबरला

रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ ऑक्टोबरला

रत्नागिरी :
ऑक्टोबर २०२६ चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनात मिळालेल्या उत्तराने समाधान न झाल्यास संबंधित अर्जदार जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू शकतो.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज १५ दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये सादर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी या प्रक्रियेचे पालन करून आपल्या तक्रारी व अर्ज सादर करावेत, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here