कोल्हापूर जिल्ह्यात २८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश
कोल्हापूर जिल्ह्यात २८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
कोल्हापूर :
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) (अ) ते (फ) आणि कलम ३७ (३) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी हा आदेश दिला असून, २८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तो लागू राहणार आहे.
या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असलेल्या बाबींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य बजावताना संबंधित वस्तू हाताळण्याची किंवा एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्यास त्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच पोलीस विभागाची पूर्वपरवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही आदेशातील निर्बंध लागू होणार नाहीत.
सर्व जाती-धर्मांचे सण, उत्सव, जयंती, यात्रा आदी शांततामय पद्धतीने साजरे करण्यासाठी एकत्र येणाऱ्या नागरिकांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विवाह, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण तसेच अंत्ययात्रांनाही हे निर्बंध लागू राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.