ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी संवेदनशील सामाजिक भूमिका आवश्यक : बप्पासाहेब थोरात
ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी संवेदनशील सामाजिक भूमिका आवश्यक : बप्पासाहेब थोरात
मुंबई : स्त्री मुक्ती संघटना आणि कौटुंबिक सल्ला व समुपदेशन केंद्राच्या वतीने १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, कायदेशीर संरक्षण तसेच न्यायाधिकरणाच्या कार्यपद्धतीविषयी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला २२६ ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.
ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी संवेदनशील सामाजिक भूमिका आवश्यक : बप्पासाहेब थोरात
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे केवळ कायदेशीर वाद म्हणून न पाहता त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक आणि भावनिक परिस्थितीचाही विचार करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने, सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने जीवन जगता यावे, यासाठी समाजाने अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी केले.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय अधिकारी मुंबई शहर बप्पासाहेब थोरात तसेच समाजकल्याण विभागाच्या पुष्पलता घटारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेले कायदेशीर अधिकार, संरक्षणाच्या तरतुदी आणि संबंधित न्यायाधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.