एमपीएससीच्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार

0
26

एमपीएससीच्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार

मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-२०२६ या तीन महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा ३ ऑक्टोबर २०२६पासून सुरू होणार होती. मात्र, आता या तिन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
उमेदवार, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. या मागण्यांचा विचार करून आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णयही आयोगाने घेतला आहे.
या निर्णयामुळे राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी तसेच गट-ब मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परीक्षांच्या नव्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसून, त्याबाबतची अधिकृत माहिती आयोगाच्या पुढील अधिसूचनेत दिली जाणार आहे.
दरम्यान, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन आणि परीक्षेच्या सुरक्षिततेबाबत उमेदवारांकडून विविध मागण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे आयोगाच्या पुढील निर्णयांकडे परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here