मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर संकटाची छाया; जलाशयांतील साठा १७ मे २०२७ पर्यंतच पुरणार

0
18

मुंबई :
मुंबई शहराला दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सभागृहात देण्यात आली. त्यामुळे आगामी काळात मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.
जागतिक हवामान संघटनेने (WMO) वर्तवलेल्या अंदाजानुसार, फेब्रुवारी २०२७ पर्यंत ‘एल निनो’चा प्रभाव तीव्र राहण्याची शक्यता आहे. या हवामान बदलाचा परिणाम भारतातील तापमान, पर्जन्यमान आणि कृषी क्षेत्रावर २०२७च्या सुरुवातीपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे राज्य सरकारने शनिवारी जाहीर केले होते. राज्यातील मोठ्या भागात निर्माण झालेल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पाणीपुरवठ्याचाही स्वतंत्रपणे आढावा घेण्याची गरज असल्याचे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या सात जलाशयांमधील पाणीसाठ्याची उपलब्धता आणि आगामी हवामान परिस्थिती लक्षात घेता, महापालिकेने लागू केलेली १० टक्के पाणीकपात वर्षाच्या उर्वरित कालावधीतही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here