ठाण्यात ‘सागरी भूमिपुत्र महासंघ’ स्थापना सोहळा उत्साहात संपन्न

0
28
ठाण्यात ‘सागरी भूमिपुत्र महासंघ’ स्थापना सोहळा उत्साहात संपन्न
ठाण्यात ‘सागरी भूमिपुत्र महासंघ’ स्थापना सोहळा उत्साहात संपन्न

ठाण्यात ‘सागरी भूमिपुत्र महासंघ’ स्थापना सोहळा उत्साहात संपन्न

ठाणे :
आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी आणि बारा बलुतेदार समाजातील भूमिपुत्रांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’चा स्थापना सोहळा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे उत्साहपूर्ण आणि भव्य वातावरणात पार पडला. भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती नियोजित होती. मात्र, काही कारणास्तव त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमाशी संवाद साधत उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि महासंघाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला पद्मश्री लक्ष्मण माने यांची विशेष उपस्थिती होती. तसेच पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना ‘विशेष सागरी रत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सागरी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी आणि सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून पुढील काळात काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विविध समाजघटकांना एका व्यासपीठावर आणत भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी ही चळवळ नव्या दमाने पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व भूमिपुत्र, स्नेहीजन आणि कार्यकर्त्यांचे भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here