नेहुली येथे कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; मल्लांच्या जिद्दीचे चित्रलेखा नृपाल पाटील यांनी केले कौतुक

0
20
मल्लांच्या जिद्दीचे चित्रलेखा नृपाल पाटील यांनी केले कौतुक
मल्लांच्या जिद्दीचे चित्रलेखा नृपाल पाटील यांनी केले कौतुक

नेहुली येथे कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; मल्लांच्या जिद्दीचे चित्रलेखा नृपाल पाटील यांनी केले कौतुक

नेहुली :
नेहुली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला शेकापच्या प्रवक्त्या सौ. चित्रलेखा नृपाल पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मैदानात उतरलेल्या सर्व मल्लांच्या खेळातील जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती क्रीडेला चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कुस्ती हा ग्रामीण भागातील लोकप्रिय पारंपरिक खेळ असून, स्थानिक पातळीवर अशा स्पर्धांचे आयोजन झाल्याने नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला संधी देण्यासाठी अशा उपक्रमांना चालना मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here