‘डिव्हाईस फॉर ड्रीम्स’मधून निगडे शाळेला १२ लॅपटॉपची देणगी

0
14
‘डिव्हाईस फॉर ड्रीम्स’मधून निगडे शाळेला १२ लॅपटॉपची देणगी
‘डिव्हाईस फॉर ड्रीम्स’मधून निगडे शाळेला १२ लॅपटॉपची देणगी

‘डिव्हाईस फॉर ड्रीम्स’मधून निगडे शाळेला १२ लॅपटॉपची देणगी

डिजिटल शिक्षणाला मिळणार चालना; जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची शाळेला भेट

निगडे (ता. मावळ) :
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मावळ तालुक्यातील निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक सुविधांची पाहणी केली.

पुणे जि. प.मु. का. अधिकारी गजानन पाटील यांनी मावळ तालुक्यातील निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक                                               शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक सुविधांची पाहणी केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या ‘डिव्हाईस फॉर ड्रीम्स’ या उपक्रमात सहभागी होत Lady BamFord संस्थेने निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला १२ लॅपटॉप देणगी स्वरूपात दिले आहेत. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शाळेतील डिजिटल क्लासरूमची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून डिजिटल शिक्षणाच्या वापराबाबत माहिती घेतली. नव्या डिजिटल सुविधेमुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचा मोठा उपयोग होत असून, निगडे शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या १२ लॅपटॉपमुळे त्यांच्या डिजिटल शिक्षणाला निश्चितच चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here