कोविडचा नवीन व्हेरिएंट – कप्पा

0
109

कोरोना व्हायरसचा रोज नवनवीन व्हेरिएंट येत आहेत. देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये आता कोरोनाचे नवे रुप असलेल्या कप्पा व्हेरिएंटची सात प्रकरणे राजस्थान आणि उत्तर प्रदेशात आढळली आहेत. कोरोना विषाणूच्या डेल्टाप्रमाणेच कप्पा देखील डबल म्युटेशन आहे.कोरोनाच्या जीनोम सिक्वेंसिंगसाठीचे सकारात्मक नमुने राजस्थानची राजधानी जयपूरमधील एसएमएस मेडिकल कॉलेज दिल्लीमधील एक लॅब आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवले जातात. येथे दुस-या लाटेतील रुग्णांचे 174 नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 166 नमुने डेल्टा व्हेरिएंटचे आणि पाच कप्पा व्हेरिएंटचे असल्याचे आढळले होते.

कप्पा व्हेरिएंट कोरोना विषाणूच्या डबल म्युटेंट व्हेरिएशन म्हणजे दोन बदलांनी बनला आहे. हे B.1.617.1 म्हणून देखील ओळखले जाते. विषाणूचे हे दोन म्युटेशन्स E484Q आणि L453R या वैज्ञानिक नावांनी ओळखले जातात.ऑक्टोबर 2020 मध्ये भारतात कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला होता.WHO ने कप्पा व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ ऐवजी ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित केले आहे. कप्पा व्हेरिएंटमुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे नुकसान होईल.भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन,कोविशिल्ड कप्पा व्हेरिएंट विरूद्ध प्रभावी आहे.

कोरोनाच्या कप्पा व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात स्वच्छ करणे या नियमांचे काळजीपूर्वक पालन केले पाहिजे.कामाशिवाय घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि शक्य तितक्या लवकर कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्या. लसीचे दोन्ही डोस घेतलेले 95% लोक डेल्टा आणि बीटा व्हेरिएंटवर मात करु शकले आहेत. कप्पा देखील डेल्टासारखा डबल म्युटंट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here