कृष्णापटणम अदानी पोर्टच्या अत्याधुनिक सुविधांची नितेश राणे यांनी केली पाहणी

0
13
कृष्णापटणम अदानी पोर्टच्या अत्याधुनिक सुविधांची नितेश राणे यांनी केली पाहणी
कृष्णापटणम अदानी पोर्टच्या अत्याधुनिक सुविधांची नितेश राणे यांनी केली पाहणी

कृष्णापटणम अदानी पोर्टच्या अत्याधुनिक सुविधांची नितेश राणे यांनी केली पाहणी

मुंबई :
आंध्र प्रदेशातील कृष्णापटणम येथील अदानी पोर्टला भेट देत बंधारे मंत्री नितेश राणे यांनी बंदर क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षण पद्धती, कौशल्य विकास आणि ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टीच्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी ‘कार्गो हँडलिंग इक्विपमेंट ट्रेनिंग सिम्युलेटर्स’ तसेच ‘ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी एक्सलन्स सेंटर’ची पाहणी केली.

आधुनिक बंदरांच्या विकासासाठी कुशल, सुरक्षित आणि तंत्रज्ञानसज्ज मनुष्यबळाची आवश्यकता असून, कृष्णापटणम अदानी पोर्टमध्ये प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती राणे यांनी घेतली. बंदर आणि सागरी क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या या पद्धतीचा महाराष्ट्रातही उपयोग करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रात वाढवण बंदर, मरीन क्लस्टर आणि दिघी पोर्ट यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळत आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ महाराष्ट्रातच तयार व्हावे, यासाठी कृष्णापटणमच्या धर्तीवर राज्यात स्किल ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा विचार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक जागा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून, महाराष्ट्रात प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला अदानी स्किल सेंटरच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या माध्यमातून राज्यातील तरुणांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच बंदर आणि सागरी क्षेत्राच्या विकासाला प्रशिक्षित मनुष्यबळाची ताकद मिळणार आहे. विशेषतः कोकणासह राज्यातील किनारपट्टी भागातील तरुणांसाठी स्थानिक पातळीवर आवश्यक कौशल्ये विकसित करून सागरी आणि बंदर क्षेत्रात रोजगार व करिअरच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी अदानी कृष्णापटणम पोर्ट लिमिटेडचे CEO जगदीश एन. पटेल, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे CEO प्रदीप पी., Chief Port Officer कॅप्टन प्रवीण खारा, Executive Engineer मनीष मेटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here