१० ऑक्टोबरला दिल्लीतील दोन प्रमुख रेल्वे स्थानकांवर मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द
नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर सकाळी ४ ते दुपारी २ वाजेपर्यंत रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार
नवी दिल्ली :
नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन या दोन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या परिसरातील रस्त्यांवर तीव्र वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४ ते दुपारी २ वाजेपर्यंत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



